निर्भय स्पोर्ट अकॅडमी चे खेळाडु ची राज्यस्थरीय स्पर्धेत निवड

Tue 07-Oct-2025,01:35 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधि आसीफ मलनस हिंगणघाट 

वर्धा - निर्भय स्पोर्ट अकॅडमी, वर्धा चे वतीने वैयक्तीक खेळाचे खेळाडु तयार करून खेळाडुना प्रत्येक वर्षी राष्ट्रीय खेळाडु तयार करतात व जिल्हयाचे नाव लौकीक करतात, या अकडॅमी मध्ये ग्राप्लींग, कुस्ती, ज्युदो, जीत कुने दो, कुराश, बॉक्सींग, अशा अनेक खेळाचे धडे मुलांना दिले जातात व वरीष्ट स्थरावर खेळवले जातात आणि हे सर्व खेळ निशुल्क प्रमाणे खेळवले जातात.

नुकत्याच शालेय विभागातील स्पर्धा सुरू असुन त्यात निर्भय स्पोर्ट अकॅडमीचे खेळाडुनी भाग घेतला व नुकत्याच पार पडलेल्या खेळ मध्ये ग्राप्लींग, बॉक्सींग, पॉवरलिप्टींग, मधे खेळाडुनी भाग घेवुन राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे.

ग्राप्लींग (19 वर्षा खालील ) मध्ये नचिकेत बोटकुले, पुष्पकुमार राठोड, आदित्य नवले,

बॉक्सींग - 19 वर्षा खालील नचिकेत बोटकुले

पॉवरलिप्टींग - नचिकेत बोटकुले पॉवरलिप्टींग मध्ये राज्यस्थरीय स्पर्धेत निवड झाली आहे. तसेच

-कुस्ती - विभागीय कुस्ती स्पर्धा नागपूर येथे संपन्न झाल्या त्यात -98,अंतरिक्ष राठोड, व - 125 वजन गटातील नचिकेत बोटकुले यांनी सुवर्ण पदक घेऊन राज्यस्थरीय स्पर्धे करीता निवड झाली.

यावर्षी विशेष म्हणजे नचिकेत बोटकुले या एका खेळाडुनी ग्राप्लींग, बॉक्सीग, पॉवरलिप्टींग व कुस्ती मध्ये राज्यस्थरीय स्पर्धेत निवड झाली असुन एकूण चार खेळात राज्यस्थरीय खेळात निवड होवुन सर्वाचे लक्ष स्वताकडे केंद्रीत केले आहे.

सर्व खेळाडुनी विजयाचे श्रेय निर्भय स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष महावीर वरहारे, कोच नवनाथ भुसनार, आयोजय यशवंत गोल्हर यांना देवुन जिल्हा किडा संकुलचे जिल्हा किडा अधिकारी श्री. आशा मेश्राम मॅडम, सांजली वानखडे, अनिल निमगडे, गुलाब खोब्रागडे, साहील चंन्नावार, अकॅडमीचे सहभागी कार्यकारी, रवी काकडे, वैभव तिजारे, सुनीलभाउ उईके, मनीष वैरागडे, शिवराज शिंदे, प्रमोद खरकाटे, सागर कोठेकर, जिवन तडस, दिपाली धुर्वे, श्रावणी मेश्राम, अनिल, शिवम जाधव, तनुश्री नागोसे, अशोक पेठेकर, आई वडीलांना दिले.